breaking-newsमनोरंजन

‘रात्रीस खेळ चाले’ आता ‘रात का खेल है सारा’ होणार… हिंदीतही पहायला मिळणार मालिका…

‘रात्रीस खेळ चाले ’ मालिकेच्या पहिला भाग प्रेक्षकांनी भलताच पसंत केला होता…यानंतर आता ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेच्या दुस-या भागानेही अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठलं . मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मालिकेच्या याच लोकप्रियतेमुळेआता हीच मालिका हिंदीमध्येही पाहायला मिळणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका हिंदीमध्ये डब करण्यात आली आहे…

नुकताच या हिंदी मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे. मालिकेतील टायटल ट्रॅकला रसिकांची भरघोस पसंती मिळत आहे. यावरून मालिकाही मराठी प्रमाणे हिंदीतही रसिकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरेला असा विश्वास मालिकेच्या टीमला आहे. 

या मालिकेचे नाव हिंदीमध्ये ‘रात का खेल है सारा’ असे ठेवण्यात आले  आहे.  एन्ड टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे. २९ फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  मराठी मालिकेला जसा रसिकांचा प्रतिसाद मिळाला तसाच हिंदी मालिकेला रसिक प्रतिसाद देतात का हे पाहणे खऱच रंजक असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button