breaking-newsमनोरंजन

सोनिया-हिमेशचे गुपचूप लग्न

बॉलीवुडमध्ये सध्या एकापोठापाठ एक लग्न होत असून एकंदरित लग्न सोहळ्याचा माहोल असल्याचे दिसून येत आहे. यातच गुपचूप लग्न करण्याचा एक नवा ट्रेंड सुरू आहे. एकीकडे सोनमच्या लग्नाची तयारी सुरू असताना नेहा धुपियाने अचानक लग्नाची घोषणा करत थेट लग्नाचेच फोटो पोस्ट केले. आता या यादित आणखी एका सेलिब्रेटीचे नाव नोंद झाले आहे.

प्रसिद्ध गायक आणि संगितकार हिमेश रेशमिया याने आपल्या लॉंग टाईम गर्लफ्रेड आणि अभिनेत्री सोनिया कपूर हिच्याशी गत आठवड्यात लग्न केले असून ते लवकरच आपल्या कुटुंबियांसह मित्रांना लग्नाची पार्टी देणार आहेत. हिमेश रेशमियाचे हे दुसरे लग्न आहे. हिमेशने वयाच्या 21व्या वर्षी कोमलशी विवाह केला होता आणि त्याला स्वयम नावाच मुलगाही आहे. मात्र, 2016मध्ये हिमेशने कोमलसोबतचे 22 वर्षांचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनी 2017मध्ये घटस्फोट घेतला. दरम्यान, या दोघांच्या तणावाचे कारण सोनियाच असल्याची तेव्हा चर्चा होती. मात्र, तेव्हा हिमेश-सोनियाने त्याचा इन्कार केला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून हिमेश-सोनिया लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button