breaking-newsमहाराष्ट्र

राज ठाकरेंची ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरींना श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरींचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. यामुळे संपूर्ण साहित्य, कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सर्वच क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

मानवी आकलना पलीकडच्या विश्वातील अनेक चित्र-विचित्र अनुभवांचा शोध घेणारा लिहिता हात थांबला अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोठ्यांची मती खुंटवणारे रत्नाकर मतकरी त्याच ताकदीने लहान मुलांना विस्मयकारक अनुभव देत त्यांचं मनोरंजन करू शकत असेही ते म्हणाले. 

लहान मुलांसाठी त्यांनी २२ हून अधिक तर मोठ्यांसाठी ७० हून अधिक नाटक रत्नाकर मतकरींनी लिहिली. नाट्य- साहित्य क्षेत्रात त्यांचे अमुल्य असे योगदान आहे.

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनानंतर साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. लहान मुलांसाठी त्यांनी २२ हून अधिक तर मोठ्यांसाठी ७० हून अधिक नाटकं त्यांनी लिहिली.

चार दिवसांपुर्वी त्यांना गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. पुढील उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले होते. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

नाट्य- साहित्य क्षेत्रात त्यांचे अमुल्य असे योगदान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डॉ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे.

नाटकं, एकांकिका, कथासंग्रह, कादंबरी, लेख संग्रह अशा साहित्याच्या सर्वच क्षेत्रात त्यांचा वावर होता. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिकांचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा’, आणि अशा अनेक नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं. त्याच्या अलबत्या गलबत्या या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button