breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनमध्ये 84 हजार नव्हे, 6.4 लाख हाेते रुग्ण! नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नाॅलाॅजीतून माहिती लीक

बीजिंग | चीन काेराेना विषाणू संसर्गाची माहिती दडवत आहे? हा प्रश्न दाेन-तीन महिन्यांपासून चर्चिला जात आहे. परंतु आजवर त्याचे ठाेस पुरावे मिळत नव्हते. आता मात्र चीनचा खाेटारडेपणा सिद्ध करणारा एक अहवाल उजेडात आला आहे.

चीन सांगताेय त्याप्रमाणे या देशात ८४ हजार नव्हे, तर ६.४ लाख लाेक काेराेनाने बाधित हाेते. हा दावा लष्कराच्या नेतृत्वाखाली संचालित नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नाॅलाॅजीमधून लीक झाला. लीक डेटानुसार संसर्ग वाढल्यानंतर रुग्णसंख्या ६.४ लाखांवर पाेहाेचली हाेती, परंतु चीनने मात्र ८४ हजार २९ बाधित असल्याचे मान्य केले हाेते. या लीक डेटामध्ये देशात २३० शहरांतील ६.४ लाख लाेकांची माहिती आहे. प्रत्येक एन्ट्रीमध्ये पडताळणी झालेले रुग्ण, तारीख आणि त्यांच्या ठिकाणाची माहिती इत्यादी तपशील आहे. सुरुवातीपासून एप्रिलपर्यंतची आकडेवारी त्यात नमूद आहे. प्रत्येक एन्ट्री कमीत कमी एका रुग्णाशी जाेडलेली आहे, असे मानले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button