breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्य सरकारचा निषेध : पिंपरी-चिंचवड भाजपा महिला मोर्चातर्फे वीज बिलांची होळी

पिंपरी । प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा तसेच युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने आघाडी सरकार ने जे सर्व सामान्य लोकांना लाॅकडाऊन च्या काळात जे भरमसाठ वीज बीले वाढून लावली आहेत तसेच त्या काळातील वीज बील माफ करत नाहीत म्हणून वीज बिंलाची होळी करण्यात आली, अशी माहिती महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे यांनी दिली.

शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, उपाध्यक्ष सोनम जांभुळकर, कोषाध्यक्ष अस्मिता भालेकर,चर्होली मंडल अध्यक्ष गीता महेंद्रू,चिखली मंडल अध्यक्ष कविता हिंगे,जागृती महिला प्रतिष्ठान अध्यक्ष राजश्री शिवले,सा.महिला.कार्य तेजल माटे,कामागार आघाडी राजश्री जायभाय,सोशल मिडिया युवती युवा मोर्चा पुजा आल्हाट,मंडल चिटणीस प्रिती बोंडे,हवेली बॅक संचालक मनिषा सस्ते,मंडल उपाध्यक्ष सिंधू आल्हाट,मनिषा गोसावी,संगिता घोलप,छाया गोरे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button