breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Mhada Houses Lucky Draw : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हाडाच्या सदनिकांची सोडत

मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम

वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयातील सदनिकांची संगणकीय सोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (दि. 1) काढण्यात आली. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या यादीत एकूण 3 हजार 894 घरांच्या सोडतीची घोषणा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून यातील एकही घर विकणार नाही, याची हमी घेतली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “तुमच्यामुळे आज आम्ही आहोत. कित्येक लोकांनी यात बलिदान दिलं आहे. आज तुमच्यासाठी काही केलं नाही, तर इतिहासात आमची नतद्रष्ट म्हणून नोंद होईल. म्हणूनच हे सगळं करायचं आहे. ही घरं तुमच्यासाठी देतो आहे. मला वचन द्या, यातील एकही घर विकायचं नाही. रक्त सांडवून मिळवलेली मुंबई आपली आहे. तिला विकून जाऊ नका.”

मी गिरणी कामगारांमध्येच लहानाचा मोठा झालो आहे. हे तुमचं ऋण आहे. त्यातून मी मुक्त होऊ शकत नाही. मी आज येथे तुमच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. तुमच्यासाठी कितीही केलं तरी ते कमीच असेल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. तसेच, बाजारात घरांची किंमत वाढली असली, तरी या सोडतींच्या घरांची किंमत साडेनऊ लाख रुपये इतकीच असेल, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचंही कौतुक केलं. ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांना पूर्वी टीव्हीवर बघायचो. तेव्हा ते काय बोलताय, कशासाठी बोलताय हे कळत नसायचं. आता जवळ आल्यावर ते कसे आहेत, हे कळतंय.”

एवढ्या सदनिका आणि एवढे अर्ज

म्हाडाचा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागात सदनिका बांधण्यात आल्या आहेत. यात बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवरील सदनिकांचा समावेश आहे. श्रीनिवास मिलमध्ये 544 घरांसाठी 4 हजार 850 अर्ज प्राप्त झाले होते, बॉम्बे डाईंग मिलमध्ये 720 घरांसाठी 5 हजार 518 अर्ज प्राप्त झाले होते. स्प्रिंग मिल येथील 2 जार 630 घरांसाठी 5 हजार 778 अर्ज प्राप्त झाले होते. एकंदरीत 3 हजार 894 घरांसाठी 16 हजार 146 अर्ज आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button