breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Crime news : चाकणमध्ये तरुणाचे अपहरण; डांबून ठेवले!

पिंपरी । प्रतिनिधी

चाकण पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. येथील मनीषकुमार विष्णूप्रसाद भागात यांनी फिर्याद दिली असून त्यांना डांबून मारहाण तसेच लूट केल्याची तक्रार दाखल केली आहे. अनिल गोरे हा कुठे आहे आणि  त्याची रिक्षा कुठे आहे, असे विचारत आरोपींनी या तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर त्याचे अपहरण करून त्याला जबरदस्ती रिक्षात बसवण्यात आले. त्याला पिंपरीमधील वल्लभनगरमध्ये आणून त्याच्याकडून पाकीट आणि पैसे काढून घेतले. त्याचबरोबर त्याच्या खात्यातून पैसे काढून खरेदी कार्डद्वारे दारू खरेदी करून त्याची लूट देखील केली. सदर घटना ही २० नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान १२ वाजेपर्यंत घडली आहे.

यासंदर्भात चाकण पोलीस ठाण्यात मनीषकुमार भगत (वय २४ रा. नाणेकरवाडी चाकण मूळ. झारखंड ) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सिकंदर उर्फ मोहम्मद रफिक वय ३२ रा. वल्लभनगर पिंपरी मूळ. पीसीएमसी कॉलनी निगडी, कुमार तात्याराम पाडांगळे (वय ३२ रा. निगडी ओटास्किम), अमित पांडुरंग गायकवाड (वय २५ रा. संत तुकाराम नगर पिंपरी) आणि प्रमोद उर्फ पप्पू रोहिदास फुलपगारे वय ३४ रा. गांधीनगर पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कायद्यानुसार कलम 364 (अ ),386, 387,323, 504,506, 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. अपहरण आणि लूट करण्याबरोबरच फिर्यादीच्या भावाला फोन करून २५ हजार रुपये न दिल्यास भावाला सोडणार नसल्याची धमकी देत आरोपी क्रमांक एकने डांबून ठेवल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

     दरम्यान, यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत असून या प्रकरणी अद्याप आरोपीना अटक करण्यात आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button