breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्य महिला आयोग अध्यक्षांनी सांगवीतील पीडित कुटुंबियांची घेतली भेट

  • त्या कुटूंबियाची भेट घ्यावी म्हणून महिला अध्यक्षांकडे ‘विमेन हेल्पलाईन’ संघटनेचा पाठपुरावा

पिंपरी, (महाईन्यूज) – बांधकाम साईटवर मजुरीने काम करणा-या दाम्पत्यांच्या अडीच वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर अमानवी अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने सर्वांना धक्का दिला आहे. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित कुटुंबियांच्या घरी भेट दिली. त्यांना मानसिक आधार दिला. या घटनेचा सखोल तपास करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश रहाटकर यांनी पोलिसांना दिले.

पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम साईटवर मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्यासाठी पीडित कुटुंबिय सांगवी येथे स्थायीक झाले आहे. कामावरून घरी गेल्यानंतर रात्री आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला घेऊन आई झोपी गेली होती. मध्यरात्री निष्पाप चिमुरडीचे अपहरण करण्यात आले. तिच्यावर अमानवी अत्याचार करून बलात्का-यांनी तिचा खून केला.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्रमासाठी शहरात आल्या होत्या. या घटनेची माहिती कळताच त्यांनी सांगवी परिसरात जाऊन पीडित कुटुंबियांच्या घरी भेट दिली. घटनेची विचारपूस करून त्यांनी कुटुंबियांना मानसिक आधार दिला. यावेळी विमेन हेल्पलाईनच्या अध्यक्षा निता परदेशी यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्या कुटूंबाच्या भेट घेवून त्यांना न्याय मिळवून देण्याचीही मागणी केली. यावेळी सारिका चव्हाण, शोभा नाफडे, अॅड सारिका परदेशी, हेमा वाकळे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

पोलिसांशी संवाद साधून या घटनेचा तातडीने तपास करण्यात यावा. संबंधित गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश अध्यक्षा रहाटकर यांनी पोलिसांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button