breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीतून राष्ट्रवादीच्या नवीन चेह-याला संधी ‘निश्चित’, शेखर ओव्हाळ चर्चेत

  • ओव्हाळ यांच्या विधानसभेच्या तयारीला आला वेग
  • अजित दादाही सकारात्मक असल्याची चर्चा

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या मतदार संघातून प्रभावी उमेदवारांची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. त्यातच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवीन चेह-यांना संधी देण्याचे जाहीर केल्याने नवीन इच्छुकांना आशा लागली आहे. त्यानुसार पक्षाचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ आणि विद्यमान नगरसेविका सुलक्षणा धर या दोघांची नावे खूपच चर्चेत आहेत. शेखर ओव्हाळ यांनी विधानसभेची जोरात तयारी सुरू केली आहे. अनुसूचित जातीतील एक प्रभावी आणि उमदे व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे उमेदवारीबाबत पक्षाकडून त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सत्कार भोसरीतील एका हॉटेलमध्ये शरद पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी भोसरी विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने पवार साहेबांनी एक विधान केले. विधानसभेसाठी नवीन चेह-यांना संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे विधान म्हणजे नवीन इच्छुकांना तयारीला लागण्याचा सूचक इशाराच होता. त्यानुसार भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि पिंपरीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन आणि समाजकार्यास स्वतःला झोकून देणा-या  उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. पक्षाकडून नवीन उमेदवारांची आतापासूनच चाचपणी सुरू आहे. नवीन उमेदवारांमध्ये शेखर ओव्हाळ आणि सुलक्षणा धर या दोन इच्छुकांनी पक्षाकडे तिकीटाची मागणी केल्याचे समजते.

पुनावळे येथील शेखर ओव्हाळ हे या भागातील माजी नगरसेवक राहिलेले आहेत. नगरसेवक असताना त्यांनी पुनावळे या मर्यादीत क्षेत्राबाहेर पडून पिंपरी-चिंचवड शहरात आपली छबी उमटविण्यासाठी सामाजिक कार्यातून योगदान दिले आहे. त्यामुळे समाजामध्ये त्यांना प्रभावी व्यक्तीमत्व असे मानले जाते. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीही सुरू केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांनी समाजातील लोकांशी संपर्क वाढवून एकजूट तयार करण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्यातच ओव्हाळ यांचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी थेट संबंध आहेत. तिकीटासाठी त्यांनी दादांकडे फिल्डींगही लावली आहे. त्यांच्या नावाला प्राधान्य मिळण्याची पक्षातून चिन्हे दिसू लागली आहेत. तर, दुसरीकडे सुलक्षणा धर या विद्यमान नगरसेविका आहे. त्या देखील राजकारणात नवीन असल्या तरी अशोक शिलवंत यांचे समाजकार्य मोठे आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. त्यांनी देखील पिंपरीतून इच्छुक असल्याचा दावा ठोकला आहे.

माजी आमदारांची जबाबदारी वाढणार

माजी आमदार अण्णा बनसोडे यांना पक्षाने भरभरून दिले. परंतु, 2014 मध्ये शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी त्यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात बनसोडे यांनी म्हणावा तेवढा सक्रिय सहभाग दाखविला नाही. त्याचा परिणाम मतदानांवर होऊन अत्यंत कमी मतदान पार्थ पवार यांना या मतदार संघातून मिळाले. परिणामी पार्थ पवार यांच्या पराभवाचे खापर बनसोडे यांच्या माथ्यावर फुटले गेले. त्यामुळे त्यांना आता उमेदवारी मिळण्याची चिन्हे अंधूक झाली आहेत. पर्यायी आणि प्रभावी उमेदवार म्हणून शेखर ओव्हाळ यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे बनसोडे यांच्यावर पुन्हा पक्ष देईल त्या उमेदवारांचे काम करावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button