TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

भाजपाच्या ‘संपर्क से समर्थन’ कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिसाद!

केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांतील सत्ताकाळात घेतलेले महत्त्वाकांक्षी निर्णय, समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या विविध योजना आणि विकासकामे यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ आम्ही समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या समोर ठेवले आहे. त्यावर समीक्षा आणि समर्थनसुद्धा करावे, अशी भावना मोदी सरकारची आहे, असे मत केंद्रीय खाद्य प्रसंस्करण उद्योग तथा जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘‘मोदी @9 जनसंपर्क अभियान’’ अंतर्गत ‘संपर्क से समर्थन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमस्थळी ओडीसा येथील रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय टंडन, शिरुर लोकसभा प्रभारी आमदार माधुरी मिसाळ, प्रदेशा उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार उमा खापरे, माजी आमदार जयश्री पालांडे, भाजपा पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे, संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, अमोल थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री पटेल बोलत होते.

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय टंडन म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात भारताने जगभरातील देशांना लस पुरवठा केला. पूर्वी टीबीच्या लसीसाठी आपल्या देशाला २७ वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. यासह अनेक टप्प्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याचा लेखाजोखा समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रतिष्ठीत लोकांच्या सूचना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हाच ‘संपर्क से समर्थन’ अभियानाचा उद्देश आहे.


नैसर्गिक आपत्ती ही कुणाच्याही नियंत्रणात नाही. मात्र, या आपत्तीच्या काळात आपण मदतकार्याचे नियोजन कसे करतो? हे महत्त्वाचे आहे. सपूर्ण जग हा एक परिवार आहे, अशा भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. कश्मिरमधील ३७० कलम रद्द करणे, तीन तलाक निर्णय, कोविड काळातील मदतकार्य, राम मंदिर निर्माण, काशी, सोमनाथ, उज्जेन येथील मंदिरांचा जिर्णोद्धार अशा आपल्या आस्थांशी संबंधित मुद्यांवर मोदी सरकार काम करीत आहेत. रशिया–युक्रेन युद्धाच्या काळात भारतीयांना सुरक्षीतपणे मायदेशी घेवून येण्याची धमक मोदी सरकारमध्ये आहे. प्रतिष्ठीत नागरिकांनी या महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत

  • संजय टंडन, सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी, भाजपा.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button