breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात थंडीच्या दिवसात पावसाचा अंदाज

मुंबई – डिसेंबरचा महिना संपल्याबरोबर कडाक्याच्या गुलाबी थंडीनेही पाठ फिरवली आहे. त्यातच आता कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 6 आणि 7 जानेवारीला या भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,42,136 वर

सध्या पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण करत आहेत. उत्तर भारतातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. राजधानी दिल्लीत प्रचंड कडाक्याच्या थंडीनंतर शनिवारी अचानक ढग दाटून आले आणि विजांसह पाऊस झाला. उत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण होते. या पश्चिमी वाऱ्यांचा महाराष्ट्रातही प्रभाव जाणवत आहे. त्यामुळेच किमान तापमानातही वाढ झाली आहे. परंतु असे असले तरी पुन्हा एकदा थंडी परतणार आहे, असाही हवामाना विभागाचा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button