महाराष्ट्र

राज्यात आणखी १६१ पोलीस कोरोनाबाधित

मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच कोरोना योद्धे असणाऱ्या पोलिसांनाही दिवसेंदिवस कोरोनाचा अधिकच संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. केवळ संसर्गच नाही, तर कोरोनामुळे पोलिसांचा मृत्यूदेखील होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यभरात आणखी 161 पोलीस कोरोनाबाधित आढळले असून एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 14 हजार 953वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 2 हजार 800 जण, कोरोनामुक्त झालेले 11 हजार 999 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 154 जणांचा समावेश आहे. राज्यातील 14 हजार 953 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1 हजार 596 अधिकारी व 13 हजार 357 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या 2 हजार 800 पोलिसांमध्ये 364 अधिकारी व 2 हजार 436 कर्मचारी आहेत.

तर कोरोनामुक्त झालेल्या 11 हजार 999 पोलिसांमध्ये अधिकारी 1 हजार 217 व 10 हजार 782 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 154 पोलिसांमध्ये 15 अधिकारी व 139 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button