breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

महान संताच्या हत्येमुळे ठाकरे सरकारची राखरांगोळी होईल- उमा भारती

पालघर जिल्ह्यात झालेल्या मॉब लिचिंगच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटले आहेत. शिवाय राज्यातील राजकारण तापलं आहे. सर्वच स्थरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. आता याप्रकरणावर मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी याप्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या असून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे गेल्या आठवड्यात जमावानं तीन साधूंची हत्या केली होती. या प्रकरणावर उमा भारती यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात उमा भारती म्हणाल्या की, महान संतांच्या हत्येत होरपळून ठाकरे राखरांगोळी होईल. याप्रकरणी त्यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं आहे.

महाराष्ट्रातील पालघरमध्ये संतांची जी निर्घृण हत्या झाली. ज्यामध्ये ७० वर्षाचे एक वृद्ध संतही होते. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. व्हिडिओत आरोपी स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांसमोर हे महापाप झालं आहे. या राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार आहे, असं उमा भारती म्हणाल्या. सर्व दोषींना फाशीची शिक्षा व्हायला हवी त्यासाठी जलग गती कोर्टाच्या माध्यमातून प्रक्रिया राबवावी. साधूंच्या जूना अखाड्याशी आपले आत्मीय संबंध आहेत. या घटनेला मी कधीच विसरणार नाही. संपूर्ण देशाने या घटनेचा निषेध केला पाहिजे, असं आवाहन उमा भारती यांनी केलंय. असेही त्या म्हणाल्या.

हत्या झालेल्या महान संतांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि या महापातकचे प्रायश्चित्त म्हणून साधू- संतांनी आहे त्याच ठिकाणी उपवास करावा असं आवाहनी उमा भारती यांनी केलं आहे.

दरम्यान, पालघरच्या गडचिंचले गावातील हत्ये प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंत या प्रकरणी १०५ हल्लेखोरांना अटक केली आहे. शिवाय या प्रकणी धार्मिक रंग देऊ नका असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

हत्येप्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित

गडचिंचले येथील घटनेप्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button