breaking-newsमुंबई

राज्यात आज दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन

मुंबई – काल गणेश चतुर्थीनिमित्त ठिकठिकाणी बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. त्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा आज पार पडणार आहे. आज राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे.

गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून थेट समुद्रात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पालिकेकडून जागोजागी मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांनी शक्यतो घरातच बादली किंवा ड्रममध्ये मूर्तीचे विसर्जन करावे, अशीही सूचना पालिकेकडून देण्यात आली आहे.

त्याचबरोबर कोरोना संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने यावेळी गणेश मंडळ आणि सामान्य नागरिकांना गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंग करण्यास अनिवार्य केले आहे. यासाठी मुंबई महापालिकेने shreeganeshvisarjan.com या नावाने वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटमध्ये भाविक विसर्जनची तारीख, जागा आणि वेळ याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button