breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नदी सुधार प्रकल्पाचा आराखडा तयार; पदाधिका-यांच्या बैठकीत सादरिकरण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शासनाच्या नदी सुधार प्रकल्पांतर्गत पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा (डीपीआर) महापालिकेने तयार केला असून त्याचे सादरिकरण आज पर्यावरण विभागाने पदाधिका-यांसमोर केले. राज्य शासनाच्या मान्यतेसाठी हा डीपीआर सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील अटो क्लस्टर सभागृहात नदी सुधार प्रकल्पाच्या विकास आराखड्याचे सादरिकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी पवना आणि इंद्रायणी या दोन्ही नदीपात्रालगतच्या परिसराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये भराव टाकलेल्या ठिकाणांसह पत्राशेड, सांडपाण्याचे नाले, किती दुषीत पाणी नदी पात्रात सोडले जाते याची माहिती संकलीत केली आहे. त्यातच पात्रालगतच्या पालिकेच्या मिळकतींची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त केली आहे, याचे सादरिकरण बैठकीत करण्यात आले.

त्यातच 25 ते 100 वर्षासाठीची नदी पात्रातील लाल रेषा आणि निळ्या रेषा तपासून पूर नियंत्रण क्षेत्राचे डिजाईन तयार केले आहे. भविष्यात नदी सुधार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लगतच्या भागात वाणिज्यविषयक कॉम्प्लेक्स काढून त्याद्वारे पालिकेला महसूल प्राप्त करून देण्याचाही यामध्ये विचार झाला आहे. या प्रकल्पाचे “बेस मॅप” बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशीही माहिती कुलकर्णी यांनी दिली.

या ठिकाणचा परिसर विकसीत करणार

नदी सुधार प्रकल्पांतर्गत पवना नदीवरील दापोडीतील एसटीपी प्रकल्पालगतची जागा, थरेगाव बौध्द विहारची जागा, नाशिक फाटा ते पिंपळे गुरव परिसरातील नदी पात्राची जागा उपयोगात आणली जाणार आहे. तर, इंद्रायणी नदीपात्रात डिअर सफारी पार्कलगतच्या जागेसह आळंदी पंधा-यालगतची शहराला लागून असलेली जागा उपयोगात आणली जाणार आहे. या कामासाठी “एचसीपी प्लॅनिंग अँड डिझाईन मॅनेजमेंट” या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती संजय कुलकर्णी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button