breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६,७१,९४२ वर

  • मुंबईत १,१३४, पुणे शहरात १,५८१ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात १४ हजार ४९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर २९७ मृत्यू नोंदवले गेले. तसेच दिवसभरात ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यासह राज्यातील एकूण रुग्णसंख्या ६ लाख ७१ हजार ९४२ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा २१ हजार ९९५ इतका झाला आहे. दिलासादायक म्हणजे आतापर्यंत ४ लाख ८० हजार ११४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात्र केली आहे. तर सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत शनिवारी कोरोनाचे १ हजार १३४ नवे रुग्ण आढळले, तर ३२ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३५ हजार ३६२ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ७ हजार ३८८ इतका झाला आहे. तसेच सध्या १८ हजार ३०१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

पुणे शहरात शनिवारी १ हजार ५८१ नव्या रुग्णांची भर पडली, तर ४० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुणे शहरातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ८७ हजार ८६२ आणि कोरोनाबळींचा आकडा २ हजार २८९ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १ हजार ६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासह पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या ४० हजार ८९८ वर पोहोचली आहे. यापैकी २७ हजार १६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button