breaking-newsपुणेमहाराष्ट्र
राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरांसाठी उद्या सोडत
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण निश्चितीची सोडत उद्या बुधवारी (दि. 13) मुंबईत काढली जाणार आहे.
राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. त्यामुळे आगामी काळात महापौर हे पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षीत राहणार यासाठी ही सोडत काढली जाणार आहे. उद्या मुंबईत मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात प्रधान सचिव (नवि-2) यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढली जाणार आहे.