breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,74,488 वर

  • मुंबईत 473, पुण्यात 496 नवे रुग्ण

मुंबई – मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या 2,936 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,74,488 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 3,282 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 50 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18,71,120 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 50,151 वर पोहोचला आहे. तर सध्या 51,892 रुग्ण उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 473 नवे रुग्ण आढळले, तर 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,99,796 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,202 इतका झाला आहे. तसेच काल 440 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,80,322 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 7,390 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 496 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर दिलासादायक म्हणजे एकही कोरोनाबधिताने आपला जीव गमावला नाही. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,79,380 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7,829 इतका झाला आहे. तसेच पुण्यात आतापर्यंत 3,56,536 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 14,978 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button