breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,35,315 वर

  • मुंबईत 1,620, पुण्यात 988 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. सोमवारी आढळलेल्या 7 हजार 089 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 15 लाख 35 हजार 315 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 165 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 40 हजार 514 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 15 हजार 656 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 12 लाख 81 हजार 896 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 2 लाख 12 हजार 439 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत सोमवारी कोरोनाचे 1 हजार 620 नवे रुग्ण आढळले, तर 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 31 हजार 070 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 466 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 1 हजार 968 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईतील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 95 हजार 773 वर पोहोचली आहे, तर सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजार 693 इतकी आहे.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात केवळ 988 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 41 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 07 हजार 852 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 208 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 3 हजार 126 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 2 लाख 71 हजार 652 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. दरम्यान, सोमवारी आढळलेल्या 988 नव्या रुग्णांपैकी 351 रुग्ण पुणे शहरातील असून 246 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button