breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील प्रसिद्ध वडापाव सेंटरवर कारवाई, विक्री थांबवण्याचे आदेश

पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाकडून(एफडीए) धडक कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्याच्या वापरामुळे एफडीएने ही कारवाई केली असून जनहित व जनआरोग्याच्या कारणास्तव विक्रीचा व्यवसाय तातडीने बंद करण्याबाबत आदेश दिल्याचे एफडीएतर्फे सांगण्यात आले आहे.

कॅम्पातील गार्डन वडापावसह अख्तर केटरर्स व बागवान हॉटेलवरही अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. शहरात विनापरवाना, नोंदणीशिवाय हॉटेल, केटरर्स व वडापाव विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाक़डून कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे. गार्डन वडापावच्या बाबतीत स्पष्टपणे पावाच्या तपासणी अहवालाचा अभाव तसेच किडक्या बटाट्याचा वापर अशा कारणांचा समावेश आहे.

अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६अंतर्गत तरतुदीनुसार बंधनकारक आहे. या कायद्यात सांगितलेल्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईत बागबान रेस्टोरंट, अख्तर केटरर्स आणि गार्डन वडापाव सेंटरचा समावेश आहे. यात कामगारांची अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची अयोग्य साठवणूक, अस्वच्छता, विना परवाना व्यवसाय अशी कारणे देण्यात आली आहेत.

ही कारवाई सहआयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त संजय शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी व इम्रान हवालदार यांच्या पथकाने कली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button