breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काँग्रेसला रामराम ठोकत अभिनेत्री खुशबू सुंदरांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली – तामिळनाडूमधील तामिळ अभिनेत्री आणि नेत्या खुशबू सुंदर यांनी आज सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. खुशबू या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. त्यांनी 2010 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्या डीएमके पक्षाच्या सदस्य होत्या. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
खुशबू सुंदर यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली असून खुशबू यांच्या जाण्याने काँग्रेसचे काहीच नुकसान झालेले नसल्याचे काँग्रेस नेते के. एस. अलागिरी यांनी म्हटले. 2021 मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या भाजपा प्रवेशाविषयी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. याचदरम्यान त्या काल रविवारी दिल्लीत दाखल झाल्या होत्या. त्यानंतर खुशबू यांनी सोमवारी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. या राजीनाम्यासोबत त्यांनी एक पत्रदेखील सोनिया गांधी यांना दिले असून त्यात पक्षातील काही वरिष्ठांवर आरोप केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button