breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,28,226 वर

  • मुंबईत 2,199, पुण्यात 1,720 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. रविवारी आढळलेल्या 10 हजार 792 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 15 लाख 28 हजार 226 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 309 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 40 हजार 349 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 10 हजार 461 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 12 लाख 66 हजार 240 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 2 हजार 199 नवे रुग्ण आढळले, तर 42 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 29 हजार 450 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 430 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 1 हजार 709 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईतील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 93 हजार 805 वर पोहोचली आहे, तर सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजार 919 इतकी आहे.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 1 हजार 720 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 06 हजार 864 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 167 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 1 हजार 010 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. दरम्यान, रविवारी आढळलेल्या 1 हजार 720 नव्या रुग्णांपैकी 630 रुग्ण पुणे शहरातील असून 352 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button