breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपुरात काँग्रेसला धक्का; माजी नगरसेवकासह २०० ते २५० कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

नागपूर – नागपुरात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसच्या तब्बल २००हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. माजी मंत्री सतिश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक दिपक कापसे यांच्यासह तीन मोठ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. यात नाना झोडे, श्रीकांत कैकाडे, हरिश रामटेके यांचा समावेश आहे. इतकेच नाही, तर नागपूर शहरातील या चार प्रमुख नेत्यांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माध्यम समन्वयक नितीन तिवारी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशामुळे नागपुरात पुन्हा एकदा काँग्रेस आणि शिवसेनेत तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, सतिश चतुर्वेदी हे नागपुरातील काँग्रेसचे मोठे नाव होते. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचीही मोठी फळी होती. मात्र आता आपल्या मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी काँग्रेसला सुरुंग लावण्यास सुरुवात केली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना आमदार दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेचे नागपूर प्रभारी झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या मदतीने शहरातील काँग्रेस फोडण्यास सुरुवात केली असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button