breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 71,20,539 वर

  • 24 तासांत 66,732 नवे रुग्ण

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत आहे. दररोज 70 ते 80 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. आज या आकडेवारीत काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत देशात 66 हजार 732 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 816 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या 71 लाख 20 हजार 539 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 09 हजार 150 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 61 लाख 49 हजार 536 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 8 लाख 61 हजार 853 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 8 राज्यांमध्ये 48 टक्के रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यात महाराष्ट्रातील 15 जिल्हे, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरातमधील प्रत्येकी दोन जिल्हे आणि पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एका जिल्ह्याचा समावेश आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यासह 10 राज्ये अशी आहेत जिथे कोरोनाचे 77 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button