breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 14,80,489 वर

  • मुंबईत 2,848, पुण्यात 2,353 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. बुधवारी आढळलेल्या 14 हजार 578 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 14 लाख 80 हजार 489 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 355 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 39 हजार 072 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 16 हजार 715 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 11 लाख 96 हजार 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 2 लाख 44 हजार 527 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 2 हजार 848 नवे रुग्ण आढळले, तर 46 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 19 हजार 938 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 245 इतका झाला आहे. तसेच मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजार 783 इतकी झाली आहे.

त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात केवळ 2 हजार 353 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 69 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 99 हजार 353 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 6 हजार 970 इतका झाला आहे. दरम्यान, मंगळवारी आढळलेल्या 2 हजार 353 नव्या रुग्णांपैकी 959 रुग्ण पुणे शहरातील असून 570 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे आता पुणे शहराची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 51 हजार 402 एवढी झाली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या 81 हजार 942 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button