breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११,४५,८४० वर

  • मुंबईत २,३८९, पुण्यात ४,५७१ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात गुरुवारी २४ हजार ६१९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ३९८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच १९ हजार ५२२ जण कोरोनावर मात करून घरी परतले. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ११ लाख ४५ हजार ८४० वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा ३१ हजार ३५१ इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत ८ लाख १२ हजार ३५४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात २ हजार ३८९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ७८ हजार २७५ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार ३२० इतका झाला आहे. तसेच सध्या ३२ हजार ८४९ व्यक्ती कोरोनावर उपचार घेत आहेत.

पुणे शहर, जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ४ हजार ५७१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. यासह जिल्ह्याचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ४० हजार ४२३ वर पोहोचला आहे. तसेच शहर व जिल्ह्यात गुरुवारी ८५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ४५१ एवढी झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही गुरुवारी वाढल्याचे दिसून आले. शहरात दिवसभरात २ हजार २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर शहरात काल १ हजार ९६४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे येथील रुग्णसंख्येने सव्वालाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत शहरातील बरे झालेल्यांची संख्या १ लाख ६ हजार १९७ इतकी झाली आहे. तर शहरात १७ हजार ३७२ रुग्ण सक्रिय आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button