breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीत दगडाने ठेचून केला खून, नंतर गुलाबपुष्प ठेवून वाहिली श्रद्धांजली

सांगली :कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बगाप्पा महानूर (वय २१) असे मृताचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर मृतदेहा शेजारी गुलाब फूल आढळून आले आहे. या प्रकरणी कवठेमंकाळ पोलिसांनी अवघ्या चार तासात दोघा संशयितांना अटक केली आहे. (a young man was murdered and a rose was offered to him)

कवठेमहांकाळ तालुक्यातल्या विठूरायाचीवाडी या ठिकाणी गुरुवारी दुपारच्या सुमारास बगाप्पा बाळासाहेब महानूर (वय २१) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. डोक्यात दगड घालून चेहरयाचा चेंदामेंदा करत ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जत-कवठेमहांकाळ रोडवर असणाऱ्या एक बंद मिलच्या मागे बगाप्पा महानूर याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

तसेच खुनाच्या घटनेनंतर मृतदेहाजवळ एक गुलाब पुष्प ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत गतीने तपास करत या खून प्रकरणी अवघ्या चार तासात संशयित आरोपींना अटक केली आहे. रॉबिन खोत (वय-२१) राहणार पिंपळवाडी, कवठेमहांकाळ आणि संजय गगनमाले (वय ३३), राहणार शिवाजीनगर, कवठेमहांकाळ, असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

खुनाचे कारण अस्पष्ट

हा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत कवठेमहांकाळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button