breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७,१८,७११ वर

  • मुंबईत १,८५४, पुण्यात ३,२४४ नवे रुग्ण

मुंबई – राज्यात मंगळवारी कोरोनामुळे ३२९ रुग्ण दगावलेले असतानाच बुधवारी आणखी २९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासह राज्यातील कोरोनाबळींची संख्या २३ हजार ८९ इतकी झाली आहे. तर दिवसभरात १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर बुधवारी ७ हजार ६३७ जण बरे होऊन घरी परतले. यासह राज्यात आतापर्यंत ५ लाख २२ हजार ४२७ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बुधवारी दिवसभरात कोरोनाचे १ हजार ८५४ नवे रुग्ण आढळले, तर २८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३९ हजार ५३७ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ७ हजार ५०५ इतका झाला आहे. तसेच मुंबईत सध्या १८ हजार ९७९ जणांवर उपचार आहेत.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३ हजार २४४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील १ हजार ६१७ रुग्णांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येने दीड लाखांचा आकडा ओलांडला आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख ५३ हजार १४१ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ६२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा ३ हजार ८०४ वर पोहोचला आहे. तसेच दिवसभरात ३ हजार २१२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत १ लाख १८ हजार ५९० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button