breaking-newsTOP Newsआरोग्यकोरोनाव्हायरसताज्या घडामोडी

#CoronaVirus: चिंताजनक! फुफ्फुसंच नाही तर कोरोना ‘या’ अवयवांवरही करतो परिणाम, AIIMSच्या तज्ज्ञांचा दावा

नवी दिल्ली: कोरोनामुळे फुप्फुसांवर परिणाम होतो आणि श्वसनाचे विकास होण्याचा धोका असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र कोरोनाचा धोका हा केवळ फुफ्फुसांनाच नाही तर शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम करणार आहे असा दावा एम्समधील तज्ज्ञांनी केलेला आहे. सुरुवातील कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर फुफ्फुस आणि हृदयाचे आजार बळावण्याचा धोका सर्वाधिक होता.

श्वसनाच्या लक्षणांवरून सौम्य, मध्यम, गंभीर तीन वर्गीकरण करणं गरजेचं आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, न्यूरोलॉजिकल विभाग प्रमुख डॉ. एम.व्ही. पद्म श्रीवास्तव, हृदय रोगशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अंबुज राय यांच्यासह आणखीन काही तज्ज्ञांनी याबाबत चर्चा केली आहे. शरीरातील इम्युनिटी सिस्टीम खराब करतो, याशिवाय न्यूमोनियाचा धोकाही अधिक असतो. शरीरातील रक्त वाहिन्यांवर कोरोनाचे विषाणुंमुळे परिणाम होतो. किडणी, मेंदूमधील रक्ताभिसरणावरही काही वेळा होण्याची शक्यता असू शकतेय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button