पिंपरी / चिंचवड

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत थेरगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मारले अजिंक्यपदक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – थेरगाव येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात १४ वर्ष मुलींच्या कबड्डी संघाने बारामती येथे महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक संचालनालय यांच्यातर्फे घेतलेल्या शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. महाराष्ट्र राज्याच्या संघासाठी विजेत्या संघातील भूमिका कमलेश गोरे आणि रूपाली त्र्यंबक डोंगरे यांची राष्ट्रीय शालेय स्पर्धेत निवड झाली आहे.

या स्पर्धा दि. १५ ते १८ दरम्यान पार पडल्या. या उत्तुंग यशाबद्दल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या हस्ते विजयी संघातील खेळाडुंचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यध्यापक सौदागर शिंदे, क्रिडाशिक्षक बन्सी आटवे, क्रिडा संघ व्यवस्थापक सोनाली जाधव, कृष्णराव टकले, शांताराम जाधव, संघनायक तेजल महाजन, राष्ट्रीय संघात निवड भुमिका गोरे, रूपाली डोंगरे, कबड्डी खेळाडू कोमल राठोड, चांदनी गायकवाड, विद्या गायकवाड, सविता गवई, निकिता माळी, मांजरे दियाश्री, सरदार सलोनी, तेलंग पूजा, कडगंची कीर्ती यांचा सन्मान करण्यात आला. यावेळा आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सदस्य विलास मडीगेरी, राजू मिसाळ, अमित गावडे, राजेंद्र गावडे, विकास डोळस, मोरेश्वर भोंडवे, नगरसदस्या करुणा चिंचवडे, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, साधना मळेकर तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी प्रशासन अधिकारी रमेश भोसले यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button