breaking-newsराष्ट्रिय

राजस्थानात गुर्जरांसह पाच जातींना 1 टक्का आरक्षण

जयपूर – राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत 1 टक्का आरक्षणाला मंजूरी दिली आहे. यामध्ये गुर्जर, गाडरिया, रेबारी, गाडिया लोहार आणि बंजारा यांचा समावेश आहे. 7 जुलैला जयपूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये निदर्शने करण्याचा इशारा गुर्जर आरक्षण संघर्ष समितीने राजस्थान सरकारला दिला होता. तसेच समाजाच्या प्रतिनिधींनी संबंधीत मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरक्षणाची घोषणा करण्याचा अल्टिमेटमही दिला होता. त्यानुसार, राजस्थान सरकारच्या कार्मिक विभागाने सोमवारी याबाबत घोषणा केली.

अतिमागास समाजाला अन्य मागास वर्गाप्रमाणे 21 टक्के आरक्षणाचा अधिकार आहे. सरकारच्या आदेशानुसार, जर शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये या अतिमागास वर्गातील लोकांना सर्वसामान्यपणे प्रवेश अथवा नियुक्ती मिळत नसेल तर 21 टक्के आरक्षणानुसार त्यांचा विचार व्हावा. त्यानंतर या वर्गातील व्यक्तीला निश्‍चित करण्यात आलेल्या 1 टक्का आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, असे कार्मिक मंत्रालयाने म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button