breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख लोकांचा मृत्यू

मुंबई | जगभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात आतापर्यंत ५७ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभरात कोरोनामुळे ३ लाख ५५ हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिली आहे. तसेच जगभरात २४ लाख ९४ हजार रुग्ण बरे झाले आहेत.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या १ लाखाचा आकडा ओलांडला आहे. अमेरिकेत जवळपास १७ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात कोरोनाची लागण झालेल्या एकूण संख्येच्या ३० टक्के रुग्णांची संख्या एकट्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत आतापर्यंत १,००,२७६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिली आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत ३७,४६० लोकांचा कोरोनामुळे प्राण गामावले आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या २६७,२४० इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाची बाधा झालेल्या झालेल्या देशांच्या यादी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. ब्राझीलमध्ये ४११,८२१ कोरोनाबाधित आहेत. तर २५, ५९८ लोकांचा मृत्यू झाला. स्पेनमध्ये कोरोनामुळे २७,११८ लोकांचा मृत्यू झाला. २८३,८४९ लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत ३३,०७२ मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा २३१,१३९ इतका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button