breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सोनूची ‘Smile’ झळकणार आता ‘Lays’ च्या पाकिटावर

इंटरनेटच्या आजच्या जगात कधी कोण ‘फेमस’ होईल याचा काही नेम नाही. आता अशाचप्रकारे केवळ आपल्या एका स्माईलच्या जोरावर सोनू नावाचा एक तरुण भलताच फेमस झाला आहे… सोनू हा झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय असून सध्या सोशल मीडियावर झोमॅटोच्या या ‘हॅप्पी रायडर’ची जोरदार चर्चा सुरूये. हा सोनू कोणत्या डान्स किंवा गाण्यामुळे फेमस नाही झाला तर त्याच्या एका स्माईलमुळे तो भलताच फेमस झाला..एका स्माइलमुळे सोशल मीडियाला त्यानं आपल्या प्रेमात पाडलं…

सोनूचं निरागस हास्य पाहून झोमॅटोनेही त्याची दखल घेतलीये.झोमॅटोने त्याचा व्हायरल झालेला फोटो चक्क आपल्या ट्विटर प्रोफाइलवर लावला आहे. सोनूचा फोटो प्रोफाईल फोटो म्हणून लावताना झोमॅटोने आता, “हे हॅप्पी रायडर फॅनचं अकाउंट आहे” असं ट्विट केलं.

Lays India ने तर थेट आपल्या चिप्सच्या पाकिटावरच सोनूचा फोटो वापरला. “एक स्माईलने कोट्यवधी लोकांचं हृदय जिंकता येतं”, अशा मेसेजद्वारे Lays ने सोनूच्या फोटोसह चिप्सच्या पाकिटाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय.

एवढच नाही तर महाराष्ट्र पोलिसांनीही त्याच्या स्माईलचं कौतूक केलं आहे…आणि त्यासोबत त्यांने हेलमेट घालून त्याची दक्षताही दाखवल्याबद्दल सोनूचं कौतूक केलं आहे…

ज्या व्हिडिओमुळे सोनू फेमस झाला त्या व्हिडिओमध्ये सोनूला त्याचा पगार किती असं कोणीतरी विचारलं. त्यावर सोनू आपल्या खास स्माईलसह १२ तासांच्या कामासाठी दररोज ३०० रुपये मिळतात असं उत्तर दिलं.”डिलिव्हरी करताना कोणत्याच ऑर्डरच्या बॉक्समधून काही काढून खात नाही. पण, ऑर्डर कँसल झाल्यावर मजा येते, कारण कॅंसल झालेल्या ऑर्डरचे आम्ही मालक असतो”, असं सोनू व्हिडिओत बोलताना दिसतो. संपूर्ण व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील हास्य तसुभरही कमी होत नाही. त्याचं हेच निरागस हास्य नेटकऱ्यांना भावलं.

सोनूचा हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटरवर वेगाने व्हायरल होत असून त्याच्या स्माईलचं सर्वत्र कौतुक होतंय. अनेकांनी त्याची स्माइल क्यूट असल्याचं म्हटलंय. इतक्या कमी पगारातही तो किती पॉझिटिव्ह आहे, अशा प्रतिक्रिया युजर्सच्या येत आहेत. तर काही जणांनी झोमॅटोकडे त्यांच्या रायडर्सचा पगार वाढवण्याची मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button