breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शाहु महाराजांनी बहुजनांसाठी शिक्षणात मोठ योगदान दिलं – काशिनाथ नखाते  

 – कष्टकरी  संघर्ष महासंघाकडून जयंती उत्साहात  साजरी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राजर्षि छत्रपती शाहू महाराज हे थोर समाजसुधारक होते,  बहुजन, कष्टकरी, शोषित, वंचित घटकांतील मुलांना शिकवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यासाठी मोफत सक्तीचे शिक्षण करण्यासह आरक्षण देऊन ते प्रत्यक्षात आणणारे वंदनीय राजे होते, असे प्रतिपादन कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यानी केले.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चिंचवड येथील राजर्षी शाहू जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष  राजेश माने, उमेश डोर्ले  ओमप्रकाश मोरया, मिथून राठोड, अबेदाबेगम शेख, मिनाक्षी जाधव, सोनम पारवे, महादेवी कटकधोड, शारदा खंडागळे, आशा  वाकळे, नमिता  शिंदे, छाया शिंदे, माया शेटे आदी उपस्थित होते.
नखाते म्हणाले की, शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. आणी सर्वाना एकत्र शिक्षण केले. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी  निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी  सुमारे १०० वर्षापुर्वी फार मोठा आदर्श समाजापुढे  उभा केला त्यांचा आदर्श घेऊन आजची पिढी घडणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद कलाटे यानी केले. तर वंदना  थोरात यानी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button