breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

चिंचवडगावातील पवना नदीत दोन जण बुडाले; शोधकार्य सुरु…

पिंपरी |

चिंचवडच्या पवना नदीतून थेरगाव येथे येणाऱ्या चार जणांपैकी दोघे बुडाल्याची शक्यता आहे. यातील दोघे बचावले असून दोन जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले आहे. रवी राजकुमार गायकवाड (वय १३), नरसिंग महादेव जाधव (वय २१, दोन्हीही रा. काळेवाडी), असे बचावलेल्या दोघांची नावे आहेत. तर पिंटू विठ्ठल गायकवाड (वय ३५), ओम प्रकाश जाधव (वय २५, दोन्हीही रा. काळेवाडी), असे शोध सुरू असलेल्या दोघांची नावे आहेत.

वाकडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी गायकवाड, नरसिंग जाधव, पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे चौघेही रविवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड येथून पवना नदी पात्रातून थेरगाव येथील स्मशानभूमीजवळ येत होते. चौघांनाही पोहता येत असल्याने ते पोहत येत होते. त्यात रवी गायकवाड व नरसिंग जाधव हे नदी पात्रातून सुरक्षीत बाहेर आले. मात्र पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे नदी पात्रातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध सुरू केला. थेरगाव येथे पवना नदीपात्रात गाळाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे दोघे तेथे बुडाले असल्याची शक्यता आहे.

वाचा- ‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’, आणखी एका नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button