breaking-newsमनोरंजन

राजकुमारसोबत मौनी रॉय जाणार चीनला

अक्षय कुमारच्या “गोल्ड’ चित्रपटात आणि “नागिन’ मालिकेतून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मौनी रॉय लवकरच झळकणार आहे. तिने “गोल्ड’नंतर आलियाचा “ब्रम्हास्त्र’ चित्रपटही साईन केला असून त्यानंतर आता मौनी अभिनेता राजकुमार रावसोबत “मेड इन चायना’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी दोघेही चीनला जाणार आहेत.

याबाबतची माहिती फिल्म ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्‌विटवरुन दिली. लवकरच मौनी रॉय राजकुमार रावसोबत एक कॉमेडी चित्रपट “मेड इन चायना’चा भाग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“हिंदी मीडियम’सारखे हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक दिनेश विजन यांच्या चित्रपटात राजकुमार राव एका उद्योगपतीची भूमिका साकारणार असून मौनी ही मुंबईतील असून ती काही कारणास्तव अहमदाबादला जाते. मौनी राजकुमार रावच्या पत्नीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. ते एक निम्नमध्यम वर्गीय कुटुंबातील असतात. ती राजकुमार रावला चीनमध्ये व्यवसायाची चांगली संधी असल्याचे सांगून चीनला जाण्यासाठी प्रवृत्त करते. या दरम्यान होणा-या अनेक विनोदी घटनांवर चित्रपट आधारित आहे. “मेड इन चायना’ चित्रपटाच्या शूटिंगला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार असून गुजरात आणि चीनमध्ये याचे चित्रीकरण होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button