breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डी तहसील कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात भाजपची निदर्शने

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असून संबंधित आरोपींना कडक शासन व्हावे, तसेच शेतकरी प्रश्नाबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांर्भियाने प्रश्न सोडवित नाही. याच्या निषेधार्थ पिंपरी – चिंचवड शहर भाजपतर्फे मंगळवारी (दि २5) सकाळी ११ वाजता आकुर्डी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील भीषण परिस्थिती आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत आंदोलनकर्त्यांनी आवाज उठविला. दिवसाढवळ्या महिलांची छेड काढून पेटविण्यापर्यंत समाजकंटकांची मजल जात असताना प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी भाजपच्या पदाधिका-यांनी तहसिलदार गीता गायकवाड यांना निवेदन दिले. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, महापाैर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहूल जाधव, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, अमित गोरखे, उमा खापरे, शैला मोळके, सीमा सावळे, अमोल थोरात, बाबू नायर, भीमाबाई फुगे, जयश्री गावडे, शैलजा मोरे, सुजाता पालांडे, सदाशिव खाडे, शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेडगे, झामाबाई बारणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी एकही आश्वासन पाळले नाही, असा आरोप सरकारवर करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी ‘ महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, अशी खंतही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. अॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळन टाकणे अशा घटना घडू लागल्यामुळे महिला व तरूण मुलींमध्ये भिती निर्माण झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपने तीव्र निषेध केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button