breaking-newsमनोरंजन

“बाटला हाऊस’मध्ये सैफच्या जागेवर जॉन अब्राहम

सैफ अली खानला बरोबर घेऊन डायरेक्‍टर निख्रील अडवाणीने “बाटला हाऊस्‌’ची घोषणा केली होती. मात्र या घोषणेनंतर काही महिन्यातच प्रोड्युसर भूषण कुमार आणि डायरेक्‍टर निखील अडवाणी यांनी या सिनेमासंदर्भात मोठ्या बदलाची घोषणा केली आहे.

“बाटला हाऊस’मध्ये सैफ अली खानच्या जागेवर जॉन अब्राहमला घेण्यात आले आहे.हा बदल सैफच्या चाहत्यांसाठी अनपेक्षित होता. सैफने स्वतःहून सिनेमा सोडला की निर्मात्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला, हे समजू शकलेले नाही. जॉन मात्र या बदलामुळे खुषीत आहे. प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित कथांवरील सिनेमांमध्ये काम करायला आपल्याला नेहमीच आवडते. अशा सिनेमांसाठी मी नेहमीच तयार असतो, असे जॉन म्हणाला. “बाटला हाऊस’ची कथा नावाप्रमाणेच दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीवर आधारलेली आहे.

दिल्लीत 2008 साली भर लोकवस्तीत झालेल्या या चकमकीमध्ये 2 दहशतवादी मारले गेले होते. दोघेजण पळून गेले होते. तर एका दहशतवाद्याला अटक झाली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. भूषण कुमार आणि निखील अडवाणीच्या “सत्यमेव जयते’मध्येही सध्या जॉन काम करतो आहे. आता हे तिघेही “बाटला हाऊस’च्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button