breaking-newsपुणे

राजकीय भेटींविनाच झाला गडकरींचा पुणे दौरा

पुणे: खासदार, आमदार नाही की महापौरही नाहीत व गेला बाजार म्हणाल तर फारसे नगरसेवकही भेटीला आले नाहीत, त्यामुळे राजकीय भेटींविनाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा पुणे दौरा शुक्रवारी पार पडला. राजकीय गर्दी नव्हती, मात्र त्यामुळे गडकरी नाराज झाले नाही तर खूषच झाले असे आज त्यांच्यासमवेत असणाऱ्यांनी सांगितले.


मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची शुक्रवारी बैठक होती. तसेच पक्षाचेकी पुण्यातील सगळे नवनिर्वाचित आमदारही मुंबईत सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू असल्यामुळे तिथेच मुक्काम ठोकून आहेत. त्यांना पक्षानेच मुंबई सोडून जायला मनाई केली आहे. त्यामुळेच खासदार गिरीश बापट, आमदार झालेल्या महापौर मुक्ता टिळक, प्रदेशाध्यक्ष असलेले आमदार चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष असलेल्या आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले आमदार सुनिल कांबळे असे सगळे आमदार मुंबईत होते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button