breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रस्त्यांच्या कामासाठी महापाैरांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागातील निधी पळविला

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तारुढ भाजपच्या महापाैर उषा ढोरे यांनी प्रभागात रस्ते अद्ययावत करण्यात येणार आहे. त्या रस्त्यांच्या कामासाठी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या प्रभागातील भक्ती-शक्ती उड्डाणपूलाच्या कामांसह अन्य विविध कामातून सुमारे सव्वा कोटी निधी उपसुचनेद्वारे वर्ग केला आहे.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जुलै महिन्याच्या विषय क्र. ५ ला सत्ताधारी भाजपाकडून उपसुचनेव्दारे सुमारे १ कोटी २६ लाख रुपये रुपये प्रभाग क्रमांक ३२ मधील नँशनल स्कुल (शुभ श्री बिल्डींग) ते स्पायसर पुलापर्यत, अन्य रस्ते अद्यायावत पध्दतीने विकसित करणे. या कामासाठी वेगवेगळ्या कामांमधून तरतूद वर्गीकरण केलेले आहे.

माझ्या प्रभाग क्र. १५ च्या भक्ती शक्ती चौकातील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचे सुशोभिकरण करणेकामी रंगीत दिवे प्रणाली विषयक कामे करण्यात येणार आहे. त्या कामातून सुमारे ५० लाख वर्ग करण्यात आलेले आहेत. भक्ती शक्ती शिल्प हे संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज हे अख्या महाराष्ट्रासह शहराची अस्मिता आहे.

पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे. या अस्मितेवरच सत्ताधारी भाजपाने घाला घातला आहे. सदरचे वर्गीकरण कोरोना सारख्या महत्वाच्या विषयासाठी केले असते. तर आमचे काही म्हणणे नव्हते. परंतु प्रभाग ३२ मधील महापौराच्या प्रभागातील रस्ते अद्ययावत करण्यास केले आहे. मुळात जागा ताब्यात आली नसताना रस्त्यांचे काम करीत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button