breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी सुरु करा

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेने युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना शहरात विविध ठिकाणी अभ्यासिका सुरु केल्या आहेत. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमध्ये सर्व अभ्यासिका बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व अभ्यासिका सुरु कराव्यात अशी मागणी, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा दि. ११ ऑक्टोंबर २०२० रोजी संयुक्त पुर्व परीक्षा दि. २२ नोव्हेंबर २०२० रोजी होत आहेत. या परीक्षेसाठी पिंपरी चिंचवड शहरामधुन बरेच विद्यार्थी बसलेले आहे.

या सर्व स्पर्धा परीक्षार्थ्यांनी शहरातील अण्णाभाऊ साठे अभ्यासिका उपलब्ध करुन मिळणेसाठी माझेकडे निवेदन दिले आहे. सदर निवेदन या पत्रासोबत जोडणेत आले आहे. स्पर्धा परीक्षार्थ्यांना शहरामधील अभ्यासिका सुरु करुन देणे आवश्यक आहे. तरी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक असल्याने शहरातील स्पर्धा परीक्षार्थ्यांची निकड लक्षात घेता त्यांना अभ्यासासाठी शहरातील अण्णाभाऊ साठे अभ्यासिकेसह सर्व अभ्यासिका उपलब्ध करुन द्याव्यात. असेही म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button