breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रस्ता रुंदीकरणासाठी संरक्षण विभागास अडीच कोटी देण्यास स्थायीची मंजूरी

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपळे निलख येथील जगताप डेअरी चौक ते पिंपळे सौदागार याठिकाणच्या शिवार चौक येथील रस्त्याचे 45 मीटर रूंदीकरण सुरू आहे.  मात्र, संरक्षण विभागाची जागा ताब्यात नसल्याने हे काम अडविण्यात आले होते.  ही जागा ताब्यात देण्यासाठी महापालिकेने 2 कोटी 65 लाख रुपयांची रक्कम संरक्षण विभागाला अदा करण्यास आज (मंगळवारी) स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम करता येणार आहे. 

यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस स्थापत्य विभागाच्या वतीने शहरातील काही मार्गावर रूंदीकरणाचे कामे सुरू आहेत. त्यापैकी पिंपळे निलख येथील जगताप डेअरी चौक येथे काम सुरू आहे. त्या अंतर्गत जगताप डेअरी चौक ते शिवार चौक या दरम्यानच्या 45 मीटर रस्त्याच्या दक्षिणेकडील संरक्षण विभागाची सीमाभिंत आहे. त्याला लागून स्ट्रॉम वॉटर वाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, सदर काम संरक्षण विभागामार्फत थांबविण्यात आलेले आहे.

त्याबाबत पालिकेच्या अधिकार्‍यांनी औंधच्या 330 इन्फ्रन्टी बिग्रेडचे कॅप्टन दिलीप शेखर यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यांनी या रस्त्यासंदर्भात उर्वरित 2 कोटी 65 लाख 48 हजार 351 रूपये संरक्षण विभागास अदा करण्याचा सूचना केल्या. त्यानंतर या  जागेवर काम करण्यास परवानगी देता येईल, असे स्पष्ट केले. त्यानुसार 2 कोटी 65 लाख 48 हजार 351 रूपये संरक्षण अदा करण्यास मंजुरी दिली आहे. या रस्त्यांसाठी महापालिकेने 4 कोटी 40 लाख 62 हजार 351 रूपये संरक्षण विभागाला अदा केले आहेत. या रस्त्याचे काम सुरू करता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button