breaking-newsपिंपरी / चिंचवड

रस्ता दुरूस्तीसाठी पिंपरीतील ‘एचए’ कंपनीच्या बाजुचा अंडरपास मार्ग बंद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी येथील अंडरपासमधील रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी या मार्गावरून होणारी वाहतूक बंद ठेवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली होती. नगरसेविका सुजाता पालांडे यांनी पुढाकार घेतल्याने या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

पिंपरीतील एचए कंपनीजवळ संत तुकारामनगरकडे जाण्यासाठी या अंडरपासचा वापर केला जातो. तसेच, संत तुकारामनगरमधून पिंपरीत जाण्यासाठीही या मार्गाचा वापर होतो. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे अंडरपासमधील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. मोठा पाऊस पडल्यास अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळे निर्माण होतात.

याची दखल घेऊन नगरसेविका सुजाता पालांडे यांनी या अंडरपास रस्त्याची अवस्था पाहिली. त्यांनी तत्काळ पिंपरी-चिंचवड महापालिकाच्या स्थापत्य विभागातील अधिका-यांशी संवाद साधून रस्ता दुरूस्तीच्या सूचना दिल्या. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून अंडरपास मधील रस्ता दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button