breaking-newsमहाराष्ट्र

खोपोली एक्झिटजवळ ट्रक ट्रेलरच्या अपघात; दोन जणांचा मृत्यू

लोणावळा: खोपोली एक्झिटजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव ट्रक मागून धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या  सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन खोपोली एक्झिटला बाहेर पडलेला ट्रक क्र. (एम एच 11 AL 1457) हा एक्सप्रेस वे ब्रिजच्या जवळ उभा असलेला ट्रेलर क्रमांक (आर जे 49 GA 2023) ला पाठीमागून जोरात धडकल्याने हा भिषण अपघात झाला. उतारावर चालकाचा वाहनावारच ताबा सुटला आणि तो  पुढे जाणार्‍या कंटेनरला जोराने धडकला. या अपघातात मागील ट्रकमधील क्लीनर व एक पॅसेंजर असे दोघेजण जागीच मयत झाले असून ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button