breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रस्टन कॉलनीतील प्रलंबित कामे आठ दिवसांत पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देणार – संतोष सौंदणकर

  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला इशारा
  • ठेकेदार बी. के. खोसे यांच्या कामाबाबत व्यक्त केली नाराजी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागातील विकासकामांचे कंत्राट ठेकेदार बी. के. खोसे यांना देण्यात आले आहेत. चिंचवडगावातील रस्टन कॉलनीमध्ये काम अर्धवट ठेवण्याची हिम्मत ठेकेदार खोसे यांनी केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बॉक्सच्या सभोवती ब्लॉक बसवले नाहीत. विद्युत वाहिन्यांच्या असंख्य केबल उघड्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेने येता-जाता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार खोसे म्हणजे पालिकेचा जावई आहे का ? पुढील आठ दिवसांत ही अर्धवट कामे पूर्ण केली नाहीत तर शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागले, असा इशारा शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत चिंचवड गावातील रस्टन कॉलनीमध्ये सिमेंट रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. रस्ते तयार झाल्यानंतर महानगरपालिकेने रस्त्यांच्या दोन्ही बाजुंवर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेतले. ठेकेदार बी. के. खोसे यांच्या नियंत्रणाखाली हे काम सुरू आहे. मात्र, गेली कित्येक दिवसांपासून हे काम अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवले आहेत, तर काही ठिकाणी ब्लॉक बसवले नाहीत. ड्रेनेज लाईन चेंबरच्या सभोवताली राऊंड मार्किंग केले नाही. त्याठिकाणचे काम अर्धवट ठेवून पुढील काम हाती घेतले आहे. तसेच, विद्युत पथदिव्यांच्या खांबासभोवती खोदकाम करुन ठेवले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बॉक्सच्या सभोवती ब्लॉक बसवले नाहीत. विद्युत वाहिन्यांच्या असंख्य केबल उघड्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेने येता-जाता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

विकासकामांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. कामाचा दर्जा आणि पूर्ण केलेल्या कामाची टक्केवारी पाहून कोट्यवधी रुपयांची बिले अदा केली जातात. मात्र, प्रत्यक्ष कामाचा दर्जा पाहण्यासाठी अधिकारी त्याठिकाणी जाऊन पाहणी करत नाहीत. क्युरी काढून संबंधित ठेकेदाराला जाब विचारला जात नाही. त्यामुळेच चिंचवड गावातील रस्टन कॉलनीमध्ये काम अर्धवट ठेवण्याची हिम्मत ठेकेदार खोसे यांनी केली आहे. ठेकेदार खोसे म्हणजे पालिकेचा जावई आहे का ?. पुढील आठ दिवसांत ही अर्धवट कामे पूर्ण केली नाहीत तर, राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असून, शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे या निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button