breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचे आढळले 246 पाॅझिटिव्ह रुग्ण

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरात आज 246 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 91 हजार 284 झाली आहे. आज 88 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 549 झाली आहे. सध्या दोन हजार 134 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच आणि बाहेरील दोन अशा सात जणांचा मृत्यू झाला.

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 601 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 664 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष कासारवाडी (वय 56), मोहननगर (वय 48), वाल्हेकरवाडी (वय 44) आणि महिला वाल्हेकरवाडी (वय 60), भोसरी (वय 80) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेली शहराबाहेरील पुरुष जुन्नर (वय 67), सातारा (वय 78) येथील रहिवासी आहेत.

सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 807 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 327 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 140 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 990 रुग्ण बरे झाले आहेत. कंटेन्मेंट झोन मधील दोन हजार 206 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात सात हजार 215 जणांची तपासणी करण्यात आली. आज 414 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 68 हजार 209 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button