breaking-newsराष्ट्रिय

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, तोळ्याचा भाव ५२ हजारांजवळ

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात आणि विशेषतः आठवडाभरापासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. आजही त्याच्या भावात ८०० रुपयांची विक्रमी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा तोळ्याचा दर ५२ हजारांच्या उंबरठ्यावर म्हणजे ५१,८३३ रुपयांवर गेला आहे. चांदीच्या दरातही आज किलोमागे ३,४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचा एक किलोचा भाव ६४,६१७ रुपये झाला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिता निर्माण झाली आहे. यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूकदारही सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९,९२० रुपये झाला. याशिवाय २४ कॅरेटचा भाव ५०,९२० रुपये झाला आहे. चांदीचा भाव किलोला ६१,२२० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोने ४९,९७० रुपये आणि २४ कॅरेट ५१,१७० रुपये झाले आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ५०,०२० आणि २४ कॅरेटचा भाव ५१४२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा भाव ४९,०६० रुपये आणि २४ कॅरेटचा ५३,४९० रुपये झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button