breaking-newsपिंपरी / चिंचवड

येस बॅंकेतील महापालिकेच्या ठेवींचे जाहीर प्रगटन करा, गजानन चिंचवडे यांची मागणी

  • करदात्यांचे पैसे खासगी बँकेत कोणाच्या परवानगीने ठेवले ?
  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण


पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

खासगी क्षेत्रातील येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ८०० ते ९८४ कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत अडकल्याचे समजते. नागरिकांच्या कररुपातून जमा झालेले पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे बंधनकारक असताना महापालिका नियम, कायद्याच्या आधारे व सक्षम अधिकारी वर्ग, स्थायी समिती, महापालिका सर्वसाधारण सभा यांच्या मंजुरी व सहमतीने ठेवण्यात आले होते का ? याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात चिंचवडे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेला विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. महापालिकेने ठेवी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या आजमितीला किती ठेवी आहेत ? कोणत्या-कोणत्या बँकेत ठेवी ठेवल्या आहेत ? या रकमांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का ? महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय आहे ? नागरिकांच्या कररुपाने उभा राहिलेला पैसा जपणे महापालिकेचे कर्तव्य आहे. करदात्यांचा पैसा कोणाच्या घशात जावू नये, याची महापालिकेने दक्षता घेणे आवश्यक आहे.

याप्रकरणाची सखोल चौकशी होऊन कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. कारण कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिक शिस्त व नियमाने चालल्यास त्याचा भविष्यात विकासकामांवर चांगलाच परिणाम होईल. त्यामुळे आयुक्तांनी करदात्या नागरिकांना त्याचे जाहीर प्रगटन करावे, अन्यथा शिवसेनेला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा चिंचवडे यांनी आयुक्तांना दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button