breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट

मुंबई | महाईन्यूज

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. पवारांच्या पत्रकार परिषदेआधी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दोघांची भेट झाली. नऊ मिनिटांच्या भेटीनंतर राऊत ‘मातोश्री’कडे रवाना झाले.

खासदार संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबरला पवारांची भेट घेतली होती. दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही राऊत म्हणाले होते. आता सत्तास्थापनेचं भिजत घोंगडं असताना राऊत-पवारांची पुनर्भेट राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडत आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘शरद पवार साहेबांना भेटलो, नेहमीप्रमाणे ही सदिच्छा भेट होती. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त केली. जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल दिल्यामुळे आपण विरोधी बाकावर बसणार असल्याचं पवारांनी सांगितलं’, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेकडे अनेक पर्याय असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मदत करण्यास सकारात्मक असल्याचीही चर्चा आहे. अशा सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पुन्हा शरद पवारांची भेट घेणं भुवया उंचावणारं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button