breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘येरे येरे पावसा’ चित्रपटावर टोकियो इंडी फिल्म महोत्सवात पुरस्कारांची मोहोर

पावसाचे आगमन हा साऱ्यांनाच तृप्त करणारा अनुभव असतो. याच आनंदाची गोष्ट सांगणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटावर ‘ ६व्या टॉप इंडी फिल्म अॅवोर्ड टोकियो जपान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ नामांकनाचा व पुरस्कारांचा आनंददायी वर्षाव झाला आहे.

सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, दिग्दर्शन, संकलन, संगीत व सर्वोत्कृष्ट संकल्पना या वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकन मिळवित सर्वोत्कृष्ट छायांकन व ध्वनी या विभागातल्या पुरस्कारांवर ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाने आपले नाव कोरले आहे. यंदाच्या पावसाने साऱ्यांनाच सुखावले आहे. या वर्षात आमच्या चित्रपटाला टोरंटो, कॅनडा आणि आता टोकियो (जपान) आदि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काररुपी पावती मिळाल्याने आम्ही सुद्धा या आनंदात चिंब झालो असल्याचे दिग्दर्शक शफक खान सांगतात. ‘येरे येरे पावसा’ चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ही पावतीच असल्याचे ही त्या आवर्जून नमूद करतात. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button